उर्वरित १७ मंडळांना पीक विम्याची अग्रीम मिळणार - आ. पाटील

उर्वरित १७ मंडळांना पीक विम्याची अग्रीम मिळणार - आ.  पाटील 

धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - पावसातील सततच्या खंडामुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील ४० महसुल मंडळांना २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याचे आदेश या पुर्वीच झाले आहेत. तर उर्वरीत १७ महसुल मंडळाना देखील २५ टक्के अग्रीम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दि.१८ सप्टेंबर रोजी जारी केली आहे. 

खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. राज्य शासनाचे अधिकारी, विमा कंपनी प्रतिनीधी व शेतकरी यांच्या संयुक्त पाहणीमध्ये ४० महसुल मंडळात ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अधिसुचना काढून जिल्ह्यातील ४० महसुल मंडळाना या पुर्वीच २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तर सध्याची पीक परिस्थीती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरीत १७ महसुल मंडळाची अधिसुचना काढली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळांना २५ टक्के अग्रीम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

खरीप पिकांची परिस्थीती अतिशय बिकट असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा  परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा देणे आवश्यक आहे. २ दिवसांपुर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपग्रहाच्या माध्यमातून नुकसानीची माहिती व वास्तव परिस्थिती विचारात घेऊन विमा कंपनीला आवश्यक ते निर्देश देण्याचे सुचित केले होते. महायुती सरकार सदैव शेतकऱ्यांसोबत असून विमा कंपनीला यात कसलीही कुचराई करु देणार नसल्याचे आ पाटील यांनी सांगितले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !