कै. माने यांच्या कुटुंबियांना आ चौगुले यांच्याकडून ५ लाखांची मदत

कै. माने यांच्या कुटुंबियांना आ चौगुले यांच्याकडून ५ लाखांची मदत

उमरगा दि.८ (प्रतिनिधी) - मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या उमरगा तालुक्यातील माडज येथील कै.किसन चंद्रकांत माने याच्या कुटुंबियांना आ ज्ञानराज चौगुले यांनी वैयक्तिक ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आ. ज्ञानराज चौगुले व किरण गायकवाड यांनी माडज येथील माने कै.माने यांच्या घरी सांत्वनपर भेट देवून मदतीचा धनादेश वडील चंद्रकांत माने यांच्याकडे सुपूर्द केला. मराठा आरक्षणासाठी मी सुरुवातीपासूनच पाठपुरावा करत आहे. पुढील काळातही मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी या लढ्यात मराठा समाज बांधवांच्या सोबत आहे. मराठा तरुणांनी धीर सोडू नये, संयम बाळगावा आपल्या कुटुंबियांचा विचार करावा. असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन आ चौगुले यांनी युवकांना केले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, विनायकराव पाटील, उपतालुकाप्रमुख नरेंद्र माने, विधानसभा संघटक शरद पवार, मधुकर माने, बळीराम गायकवाड, शरद माने, विजय माने, युवा सेना तालुका सचिव काका गायकवाड, रवी पाटील, रमेश माने, राजेंद्र माने, राम पाटील, बळीराम मारेकर, आर.डी. माने, राजाभाऊ कोळी, दाजीबा काळे, सोपान माने, ज्ञानोबा काळे, आदन पाटील व मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !