श्री तुळजाभवानी ऑनलाईन सिंहासन पुजेसाठी नोंदणी करावी
श्री तुळजाभवानी ऑनलाईन सिंहासन पुजेसाठी नोंदणी करावी
धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांची कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी येतात.
श्री देवीजींची सिंहासन पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंहासन पूजा ऑनलाईन पध्दतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर http://shrituljabhavani.org उपलब्ध करुन देण्यात येत आहे. माहे ऑक्टोबर या महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रक करण्यात येत आहे.
श्री तुळजाभवानी देवीजींचा शारदीय नवरात्र महोत्सव दि.६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत पार पडत आहे. श्री देविजींची मंचकी निद्रा ७ ते १४ ऑक्टोबर व २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत आहे. त्यामुळे या कालावधीत सिंहासन पूजा बंद राहतील. तसेच ऑक्टोंबरमधील इतर दिवशी सिंहासन पूजा ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येतील याची सर्व भाविक भक्त, महंत, पुजारी, सेवेकरी व नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच भाविकांनी सिंहासन पूजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ http://shrituljabhavani.org वरुन सिंहासन पूजा पास बुकींग या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर http://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करुन भाविकांनी आपली सिंहासन पूजेची नोंदणी करावी आणि सिंहासन पूजा नोंदणीचा लाभ घ्यावा, असे श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तर सिंहासन पूजा नोंदणी २६ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत पाठविण्यात येईल. तसेच
भाविकांना प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल. सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने द्वितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत पाठविला जाणार आहे. तसेच भाविकांना द्वितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल. प्रथम व द्वितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत पाठविण्यात येणार आहे. तर भाविकांना तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल. तसेच सप्टेंबर महिन्यातील अंतिम सिंहासन पूजा बुकींग झाल्याची यादी दि.२९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिध्द करण्यात येईल.