प्रा. सुर्यवंशी यांना स्व. मारोतराव कऱ्हाळे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


कळंब दि.९ (प्रतिनिधी) - शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील प्रा.डॉ. दीपक सुभाषराव सुर्यवंशी (मराठी विभाग) यांना हिंगोली येथील समृद्धी प्रकाशनाच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीवरील स्व.मारोतराव कऱ्हाळे आदर्श पुरस्कार २०२३ जाहीर झाला आहे.
निवडीचे पत्र संयोजक प्रा.डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी दिले आहे. या पुरस्काराचे वितरण हिंगोली येथे ऑक्टोबरमध्ये करण्यात येणार आहे.
प्रा.डॉ. सुर्यवंशी हे महाविद्यालयात २००६ पासून मराठी विषयाचे अध्यापन करतात. त्यांचे क्रांतिरत्न महाग्रंथ, ललितगंध, समतावादी साहित्यीक अण्णाभाऊ साठे आणि रंगनाथ तिवारी व्यक्ती आणि वाडमय आदी पुस्तके प्रकाशित आहेत.
तसेच प्रासंगिक लेख, शंभर पेक्षा अधिक पुस्तकांचे परीक्षण, अनेक विषयांवर शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमधून प्रकाशित आहे. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकमंगल फाऊंडेशन व मल्टीस्टेट सोलापूर शिक्षकरत्न पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद सिटी आदर्श शिक्षक पुरस्कार, श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान (क दर्जा पर्यटनस्थळ ) डिकसळ सेवागौरव , धनेश्र्वरी शिक्षण समूह महाराष्ट्र, छत्तीसगड यांचा शिक्षकरत्न पुरस्कार, गंगाई-बाबाजी फाउंडेशन, आष्टी  राज्यस्तरीय  शिक्षक पुरस्कार,  कोरोना काळातील मनोबल वृध्दींगत करणाऱ्या लेखाबद्दल, झी लाईव्ह न्यूजचा कोरोना योद्धा पुरस्कार, ज्ञान प्रसारक मंडळाचा ज्ञानदीप पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. त्याबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ.सुनील पवार, उपप्राचार्य डॉ. सतीश लोमटे, डॉ.हेमंत भगवान, डॉ . के.डी. जाधव, प्रा.दादाराव गुंडरे, हनुमंत जाधव, अरविंद शिंदे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी‌ व विद्यार्थ्यानी अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !