हैद्राबाद मुक्ती संग्रामचा इतिहास नव्या पिढीसमोर येणे आवश्यक - डॉ ओंबासे हैद्राबाद मुक्ती संग्राम रॅलीस प्रतिसाद सर्व महापुरुष व स्मारकास अभिवादन

हैद्राबाद मुक्ती संग्रामचा इतिहास नव्या पिढीसमोर येणे आवश्यक - डॉ ओंबासे 


हैद्राबाद मुक्ती संग्राम रॅलीस प्रतिसाद 


सर्व महापुरुष व स्मारकास अभिवादन 



धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - शालेय अभ्यासक्रमामध्ये इंग्रज, पोर्तुगीज, मोगल यांचा अभ्यास शिकविला जातो. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ओझरता अभ्यासक्रम शिकविला जातो.  त्यामुळे निजामाच्या जोखडातून मुक्त झालेल्या मराठवाडा, कर्नाटकातील काही भाग व तेलंगणाचा प्रदेश हा सर्व इतिहास नव्याने नव्या पिढीपुढे येणे आवश्यक आहे. या इतिहासाची सर्व माहिती मिळून नवतरुणांना प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी उपस्थितांन मार्गदर्शन करताना केले.


हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने हैद्राबाद मुक्ती संग्राम स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीस जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांचे चिरंजीव अनय, डॉ सचिन ओंबासे व अस्मिता ओंबासे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव, उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समितीचे युवराज नळे आदी उपस्थित होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून जिल्हा न्यायालय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माता रमाई आंबेडकर, सम्राट अशोक स्तंभ, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले चौक, वस्ताद लहुजी चौक, नगर पालिकेसमोरील हुतात्मा स्मारक यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर या रॅलीची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. 

यावेळी मराठवाडा नव्हे भारत मुक्ती संग्राम या युवराज नळी लिखित पुस्तकाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या रॅलीत विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी मानले.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !