१७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम देण्यास विमा कंपनीचा नकार - माने राज्यकर्त्यांचे धोरण अन् शेतकऱ्यांचे मरण !
१७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम देण्यास विमा कंपनीचा नकार - माने
राज्यकर्त्यांचे धोरण अन् शेतकऱ्यांचे मरण !
धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत जिल्ह्यातील ७ लाख ५७ हजार ८५३ शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीक विमा रक्कम भरून ५ लाख ९९ हजार ४११ हेक्टर क्षेत्र संरक्षण केलेले आहे. मात्र सततच्या २१ दिवसांच्या पावसाचा खंड असल्यामुळे ५७ पैकी ४० महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे. तर उर्वरित १७ महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांना अग्रीम देण्यास चक्क नकार दिला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र माने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२७ सप्टेंबर रोजी दिली.
धाराशिव शहरातील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या कक्षामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना माने म्हणाले की, यंदा अत्यल्प पाऊस असल्यामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिकांची अवस्था वाईट आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती बिकट असल्याचे त्यांनी सांगितले ऑगस्टमध्ये खंड पडल्यामुळे फुल गळती होऊन शंभर टक्के नुकसान झालेले आहे. मात्र विमा कंपनीच्या निकषानुसार सलग २१ दिवस पावसाचा खंड असणे बंधनकारक आहे. त्या निकषास जिल्ह्यातील 57 महसूल मंडळापैकी ४० पात्र तर उर्वरित १७ महसूल मंडळे अपात्र ठरली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या योजनेअंतर्गत पिकाच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणी पश्चात होणारे नुकसान या अंतर्गत पिकांना संरक्षण दिले जाते. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांसाठी पिहू ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ७३०४५२४८८८ या व्हाट्सअप नंबरवर टेक्स्ट मेसेज पाठवावेत. तर कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८००२६६०७०० यावर व pmfby.maharashtra@hdfcergo.com या ई-मेल आयडीवर किंवा कंपनीच्या तालुकास्तरावरील कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी स्वरूपात पूर्व सूचना देऊन त्याची पोहोच पावती घेऊन नुकसानीची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ऍपवरून नुकसान झाल्याबाबत पूर्वसूचना द्याव्यात. त्यासाठी घटनेचा प्रकार, दिनांक, पीक वाढीचा टप्पा नुकसानीची टक्केवारी फोटो व व्हिडिओ अपलोड करावा, असे त्यांनी नमूद केले. आतापर्यंत ६१०६ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असल्याचे सांगत ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेले नाही त्यांनी तक्रारी कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.
.............................
विमा कंपनीच्या प्रतिनिधीचे नाव, पद, तालुका व मोबाईल नंबर पुढीलप्रमाणे - निलेश देवकर जिल्हा व्यवस्थापक (८२७५५५७७७७), हरी ओम सोलंकी जिल्हा व्यवस्थापक (८१२०८८८५०६), अमोल मुळे जिल्हा समन्वयक (९५९५०९७७१०), महादेव जाधव धाराशिव तालुका समन्वयक (८४२१३६७२३४), मंगेश कांबळे तुळजापूर तालुका समन्वयक (९९२२७४६८३६), अभिमन्यू करणार उमरगा तालुका समन्वयक (९५५२७४६८३६), नानासाहेब बागल लोहारा तालुका समन्वयक (९९२२२९११६८), रामेश्वर बिराजदार लोहारा तालुका समन्वयक (९३२५८४३३९६), गणेश कावळे भूम तालुका समन्वयक (८८३०४२११४३), सुधीर मोहिते भूम तालुका समन्वयक (८७८८४८८३२५), तेजस अनभुले परंडा तालुका समन्वयक (९५५२८३१८६३), ज्ञानेश्वर शिंदे कळंब तालुका समन्वयक (९८८१४५०३८१), नितीन जाधव कळंब तालुका समन्वयक (९७६३७३१९४५), सुजित मोरे वाशी तालुका समन्वय (९५७९४८५२५८) व रामेश्वर सुरवसे वाशी तालुका समन्वयक (९४०३०८१०३८) हे असून यांच्याशी संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन माने यांनी केले आहे.