प्रगती पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश देणार - पाटील

प्रगती पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश देणार - पाटील

धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - प्रगती सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांशाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन प्रशांत पाटील यांनी सर्वसाधारण सभेत दिली.
प्रगती सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा चेअरमन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पाटील म्हणाले की, या पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात २ कोटी ४७ लाख रुपये इतका नफा झाला. त्यामुळे सभासदांना त्यांच्या भाग भांडवलाच्या प्रमाणात १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच
वार्षिक अहवालाच्या वाचनात संस्थेच्या आर्थिक कामगिरीचा लेखाजोखा मांडताना संस्थेची सभासद संख्या ४३७३ असून त्यात १६ टक्क्यांनी वाढ आहे. तसेच संस्थेचे भाग भांडवल १०.४३ टक्क्यांनी वाढून ४ कोटी ६० लाख ४८ हजार ३०० रुपये झाले आहे. तर गंगाजळी १४ टक्क्यांनी वाढून ३ कोटी ३० लाख ६८ हजार २१५ रुपये व इमारत निधी ११ टक्क्यांनी वाढून ३ कोटी ७९ लाख १ हजार ५५२ रुपये झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संस्थेच्या संशयित बुडीत कर्ज निधीमध्ये १०.२० टक्क्यांनी वाढ झाली असून तो निधी २ कोटी ७ लाख ३० हजार ६७४ रुपये झाला आहे. तर संस्थेच्या ठेवीमध्ये ६.१० टक्क्यांनी वाढ होऊन संस्थेच्या एकूण ठेवी ६० कोटी २३ लाख ८३ हजार ६०१ रुपये झाल्या आहेत. तसेच संस्थेने स्वनिधीतून ठेवी व भाग भांडवलातून कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता ४५ कोटी २६ लाख २७ हजार ७२९ रुपये कर्ज वाटप केले असून मागील वर्षापेक्षा त्यामध्ये जवळपास १६ टक्क्यांनी वाढ असून संस्थेला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ऑडीट वर्ग अ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी बी.आर. ढवळशंख, भाई उध्दवराव पाटील शिक्षक पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख, सहकार बोर्डाचे मधुकर जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, संस्थेचे जेष्ठ सदस्य राजेसाहेब देशमुख अंबेजवळगेकर प्रा. सचिन चव्हाण, प्रभाकर लोंढे आदी उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन डॉ. हर्षल डंबळ यांनी तर आभार शाम जाधव यांनी मानले. यावेळी संस्थेचे संचालक रमाकांत घोडके शशिकांत वैराळे, नंदकुमार भुलेकर व्यकंटेश राजे, विजयालक्ष्मी पांढरे, विमल यादव, व्यवस्थापक मोहन सावंत, जयंत पाटील, नितीन भोसले, दर्शन कोळगे, ऋषीकेश राजेनिंबाळकर, मिनिल काकडे, बालाजी गावडे, अरविंद जाधव, शरद पवार, महादेव थोरात, अविनाश यादव, मनोज पडवळ, ऍड श्रीकांत माने आदींसह कर्मचारी, कर्जदार, ठेवीदार, सभासद, खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !