ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार - ॲड. चौगुले
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार - ॲड. चौगुलेड. चौगुले
लोहारा दि.२६ (प्रतिनिधी) - लोहारा व उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशिक्षण देऊन भांडवल उपलब्ध करुन देऊन आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी केले.
लोहारा येथील गोरे कॉम्प्लेक्समध्ये ज्ञानज्योती महिला सहकारी पतसंस्था लि. धाराशिव शाखा लोहाराची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२६ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख म्हणून शिवसेना (बाळासाहेब) तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, नगराध्यक्षा तथा संचालिका वैशालीताई खराडे, पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन सारीका प्रमोद बंगले, सचिव मिरा माळी, अरुण जगताप, अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, संचालिका सुनिता जगताप, मुक्ताबाई भोजने, मनिषा शिंदे, सुलोचना वडदरे, श्रद्धानंद माने पाटील, तज्ञ संचालिका सौ.मुमताज अमिन सुंबेकर, नगरसेविका शामलताई माळी, दिपक रोडगे, संध्याताई शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी पतसंस्थेच्यावतीने शहरातील स्वच्छता विभागाच्या कर्मचारी महिला शालुबाई रोडगे, निलावती रोडगे, जिजाबाई सगट, सुनिता कांबळे, जनाबाई शेवाळे, कांचन सितापुरे, मिनाबाई कोकणे, रेश्मा शिंदे, कोमल कांबळे, राजश्री लवटे व ११ महिन्यांत कर्ज परतफेड करणाऱ्या महिला बचत गटाच्या मलेका शेख, कमल खराडे, उषा कोळी, शमीम मुल्ला, अरुणा फुलकुरते, पीग्मी एजंट व पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजयकुमार निकम, मॅनेजर भागवत पवार, कर्मचारी भागवत पवार, बालाजी जगदाळे, राजश्री घंटे, वैशाली चव्हाण, राजश्री कोळी, अनिकेत कदम, जितेंद्र कदम, शहाजी कोकाटे, श्रीकांत बिराजदार, किरण पाटील, राजेंद्र माळी, वैभव सोलंकर, अरुण सुर्यवंशी, विष्णु जाधव, आदित्य चव्हाण, रोहन खराडे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमान खराडे यांनी तर सेत्रसंचालन संदिप जगताप यांनी तर आभार अरुण जगताप मानले.