प्रसेना प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

प्रसेना प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - विविध सामाजिक कार्यक्रम, उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या शहरातील प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे यांनी नुकताच क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यानंतर प्रतिष्ठानच्या अन्य पदाधिकारी, सदस्यांसह सांची प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनीही जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या उपस्थितीत शहरातील क्रांती चौकात दि.२० सप्टेंबर रोजी पक्ष प्रवेश केला.
धाराशिव शहरात प्रसेना प्रतिष्ठान मागील १२ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम राबवित आहे. यावेळी प्रतिष्ठानच्या कुणाल मस्के, अभिजीत हौसलमल, भाग्यश्री माळाळे, प्राजक्ता मोरे, सांची प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद हावळे यांच्यासह अन्य सदस्य, पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्वीजय शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, कळंब धाराशिव विधानसभेचे अध्यक्ष मोहन मुंडे, शहराध्यक्ष सचिन तावडे, मच्छिंद्र क्षीरसागर, जमाल महेबुब तांबोळी, शमशोद्दीन जमादार, सुनील साळुंके उपस्थित होते. यावेळी सचिन तावडे, सुनील साळुंके, दिग्वीजय शिंदे व महेंद्र धुरगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन राहुल जगताप व आभार संदीप बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वप्नील बनसोडे, दादासाहेब मोटे, रूपेश बनसोडे, जीवन भालशंकर, प्रज्योत बनसोडे, नागराज साबळे, राज कसबे, धन्यकुमार क्षीरसागर, शैलेंद्र शिंगाडे, सचिन डोंगरे, सुमीत क्षीरसागर, प्रसाद माने, पृथ्वीराज सरवदे, कल्पेश बनसोडे, प्रीतम शिंगाडे, गणेश पेठे, आदींनी परिश्रम घेतले. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !