पोलीस अंमलदारास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
पोलीस अंमलदारास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - एक पोलीस अंमलदार समन्स बजावणी करण्यासाठी धाब्यावर मोटारसायकल घेऊन गेल्याचा राग मनात धरून दोघांनी त्या पोलीस अंमलदारास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील राजेंद्र मच्छींद्र कोनाळे व दत्तात्रय विनायक भोसले यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार दत्तात्रय माणिकराव कुंभार (वय- ३९ वर्षे) हे तुळजापूर येथील समन्स बजावणी करुन नळदुर्ग हद्दीतील समन्स बजावणी करण्यासाठी जात असताना तहान लागली म्हणून पाण्याची बाटली घेण्यासाठी दि.१५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नागझरी पाटील येथील विकास धाबा येथे थांबले असता वरील आरोपींनी तु धाब्यावर शासकीय मोटारसायकल का आणलीस ? अशी विचारणा करीत कुंभार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी
कुंभार यांनी सरकारच्यावतीने दिलेल्या तक्रारीवरून भा.दं.वि.सं. कलम- ३५३, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.