उमरगा तालुक्यात अनुसूचित जाती व भटक्या विमुक्त जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर

उमरगा तालुक्यात अनुसूचित जाती व भटक्या विमुक्त जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर


धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - उमरगा तालुक्यातील अनुसुचित जमाती आणि भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांची मतदान प्रक्रियेत मतदार नाव नोंदणी करणे,शिधापत्रिका वितरीत करणे व इतर अनुषंगिक सुविधा देण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर मोहिम हाती घेण्यात आली आहे.अनेक भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. जिल्ह्यातील भिल्ल, अंध, मसनजोगी, गारोडी, घिसाडी, कुडमुडे जोशी आदी (अनुसुचित जाती / भटक्या विमुक्त जमाती) त्यांच्याकडे १९५० पूर्वीचा कोणताही महसूली पुरावा नसल्यामुळे त्यांना जातीचे प्रमाणपत्र देण्यात अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या आदेशाने भटक्या जमाती (भिल्ल, अंध, पारधी, मसनजोगी, गारोडी, घिसाडी, कुडमुडे  जोशी आदी) जातीचे प्रमाणपत्र तसेच रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, संजय गांधी योजनेचा, आधार कार्ड व विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यास उमरगा तालुक्यात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

दि.५ सप्टेंबर रोजी मुळज रोडवरील कोळीवाडा (चिंचोळे मंगल कार्यालय) येथे तर ७ सप्टेंबर रोजी बिरुदेव मंदिर परिसर वस्ती येथे  शिबीर आयोजित करण्यात आले आहे.  त्यामुळे उमरगा तालुक्यातील अनुसुचित जमाती आणि भटक्या विमुक्त जमातीच्या लाभार्थ्यांनी या विशेष शिबीराचा लाभ घ्यावा‌ असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश पवार व तहसिलदार गोविंद येरमे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !