डॉ. आंबेडकर साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार

डॉ. आंबेडकर साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार

धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - तालुक्यातील
केशेगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची २६ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना साईट, अरविनदनगर येथे दि.२४ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली.

कारखाना कामकाजास सुरुवात करण्यापुर्वी उपस्थित सभासदांचे स्वागत गोरे यांनी केले. तर कारखान्याचे कार्यकारी संचालकांनी सभेच्या विषय सुचीचे वाचन केले. यावेळी अहवाल सालात दिवगंत झालेल्या व्यक्तींना श्रध्दाजंली वाहण्यात आली. तसेच अरविंद गोरे यांनी सभेच्या कामकाजास सुरुवात करुन सभेपुढे मांडलेल्या सर्व ठरावास उपस्थित सभासदांनी टाळयांच्या गजरात मंजुरी दिली. यावेळी गोरे म्हणाले की, आपल्याकडे दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे आपणास सतत ऊस व पाणी टंचाई जाणवते. परंतू आपण वेळोवेळी या संकटावर मात करत आलो आहोत. ऊसामध्ये ७० टक्के पाणी उपलब्ध असते याचा विचार करता कारखान्याने ऊसातील पाण्याचा पुन:र्वापर करण्यासाठी यंञ सामुग्री बसविलेली आहे. ऊसातील ७० टक्के निघणारे पाणी हे को-जन. व डिस्टीलरी प्रकल्पासाठी वापरण्यात येते. तसेच बॉयलींग हाऊसमधील गटरमधून वाया जाणाऱ्या पाण्याचे फिल्ट्रेशन करुन व त्याचे तापमान वाढवून पुन्हा मिल इम्बिबीशनसाठी वापर या हंगामात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मिलवरील धुतलेले पाणी व कुलींगचे वाया जाणारे पाणी व बॉयलर ब्लो डाऊनचे पाणी बॉयलरच्या वेट स्क्रबरसाठी त्याचा वापर करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्प्रे पॉण्डचे ओव्हर फ्लो होणारे पाणी ईटीपीला घेवून त्यावर प्रक्रिया करुन त्याचा शेतीसाठी वापर चालु आहे. तर आसवाणी प्रकल्पातील निघणाऱ्या पाण्याचा पुन:र्वापर करण्यासाठी सी.पी.यु. प्रकल्प उभा केला असून त्यातुन निघणारे ६० टक्के पाणी कारखाना प्रोसेससाठी व ४० टक्के पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार असल्यामुळे कारखान्याला लागणाऱ्या पाण्यात बचत होणार आहे. त्यामुळे शुन्य प्रदुषण साध्य होवून झिरो इनटेक व झिरो डिस्चार्ज ही संकल्पना अमंलात आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच
साखरेच्या दरातील चढ उतारामुळे व शासनाने साखर निर्यात बंदी केल्यामुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च व साखरेचा दर पाहता एफ.आर.पी प्रमाणे ऊस दर देण्यास कारखान्यांना अडचणी येत आहेत. तसेच सध्या पाऊस नसल्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. तर अशातच गुळ पावडर कारखान्यांचे वाढलेले प्रमाण, कारखान्यांनी वाढविलेली गाळप क्षमता याचा विचार करता कारखाने १०० दिवसही चालणार नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादकांनी ऊस तोडीस घाई न करता विचारपुर्वक कारखाना निवडून ऊस पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पाणी टंचाईचा विचार करता शेतकऱ्यांनी कमी पाण्यात कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्यादृष्टीने शेतीचे नियोजन करणे आवश्यक असून पुढील हंगामासाठी खोडवा चांगल्या पद्धतीने राखण्यासाठी कारखान्यामार्फत खोडवा व्यवस्थापण कार्यशाळा आयोजीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्षेत्रात बहुसंख्य महिला शेती करत असून त्यांना ऊस शेती विषयी मार्गदर्शन करण्यासाठी शेती विभागात महिला कर्मचारी नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद व महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे संचालक ऍड. निलेश पाटील यांनी उपस्थित सभासद, महिला सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !