धुरगुडे यांच्या हस्ते तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

धुरगुडे यांच्या हस्ते तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानावर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दि‌.१५ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
यावेळी महेंद्र धुरगुडे म्हणाले की, खेळाडूंनी व्यसनापासून दूर राहून मैदानाशी मैत्री करावी. क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवून खेळाडूंनी आपले, जिल्ह्याचे व देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच धाराशिव ते कन्याकुमारी सायकल मॅरेथॉन पूर्ण केल्याबद्दल अमोल माने यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.पद्मसिंह पाटील पतसंस्थेचे चेअरमन विक्रम पाटील, बिभिषण पाटील, रवी शितोळे, जागीरदार, अजिंक्य, तालुका क्रीडा स्पर्धेचे योगेश थोरबोले तर या स्पर्धेसाठी पंच रेनके, जावळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, लिंबराज लोखंडे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !