चळवळीच्या माध्यमातून मराठवाडा मुक्त झाला - पारवे

चळवळीच्या माध्यमातून मराठवाडा मुक्त झाला - पारवे


धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - देशाला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हैद्राबाद मुक्ती संग्राम लढला गेला. निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ त्या काळात उभारून मराठवाडा निजामापासून मुक्त करून भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला जोडण्यात आले असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष पारवे यांनी केले.  
धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सव उत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक प्रदीप तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शाळेतील शहीद स्मारकाचे पूजन करण्यात आले. यावेळी  विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख प्रमुख पाहुणे अनुरथ नागटिळक उपस्थित होते. सर्व शिक्षकांच्या निधीमधून   विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पायाळ, पाटील, बीएलओ सतीश कुंभार यांनी पुढाकार घेतला.  सूत्रसंचालन जमाले यांनी तर आभार सुनील चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावकरी, विद्यार्थी, शाळेची कर्मचारी हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !