#Baramati plane crash # बारामतीत प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले

#Baramati plane crash # बारामतीत प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले


#Baramati plane crash#  बारामती तालुक्यातील कटफल (Katfal) येथे शिकाऊ  विमान कोसळले. बारामतीतील रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळले. यामध्ये पायलट शक्ती सिंग यांना किरकोळ दुखापत झाली आहे.  बारामतीमध्ये  पायलटना प्रशिक्षण दिले जाते. या दरम्यानच ही दुर्दैवी दुर्घटना घडली. 

नेमके काय घडले ?
कटफल येथे वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. अनेक पायलट येथे विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेऊन तयार होतात. पुणे व शेजारील जिल्ह्यातही या विमानांच्या घिरट्या पहायला मिळतात. दि.१९ ऑक्टोबर रोजी देखील असेच प्रक्षिक्षण सुरु होते. या प्रक्षिक्षण दरम्यान कटफलमध्ये विमान कोसळले. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात शिकाऊ पायलट शक्ती सिंग जखमी झाले असून सुदैवाने ही दुखापत आहे. 

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिवाय स्थानिक नागरिकही अपघातस्थळी दाखल झाले. विमान कोसळले त्या ठिकाणी झाडेझुडपे, गवत दिसत आहे. अपघातग्रस्त विमान आकाराने छोटे आहे. परंतू या विमानाच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

हा अपघात नेमका कशामुळे घडला, प्रशिक्षणार्थी पायलटकडून काही चूक झाली का ? याची माहिती चौकशीतून लवकरच होईल. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
.........

सांगलीच्या आकाशात विमानांच्या घिरट्या
दरम्यान, तिकडे  सांगली जिल्ह्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून आकाशात विमानाच्या घिरट्या  सुरू होत्या. दि.१८ रोजी आटपाडी भागात तर दि.१९ रोजी तासगाव, सांगली भागात विमानाने घिरट्या घातलेल्या नागरिकांना दिसून आल्या. बारामतीच्या प्रशिक्षण केंद्राची ही शिकाऊ विमाने असल्याची माहिती आहे. कमी उंचीवरून ही विमाने आकाशात घिरट्या घालत होती. आटपाडी शहरावरून सकाळपासून विमानाने  सुमारे दोन तासाहून अधिक काळ कमी उंचीवरून घिरट्या घातल्या.  दि.१९ रोजी तासगाव व सांगली शहरातील काही भागात आकाशातून विमाने तशाच पध्दतीने व कमी उंचीवरून घिरट्या घालत असल्याची माहिती आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !