कंचेश्वर कारखान्याने ऊस बिले तात्काळ द्यावीत
कंचेश्वर कारखान्याने ऊस बिले तात्काळ द्यावीत
धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील कंचेश्वर साखर कारखान्याने ऊस गळीत हंगाम २०२२-२३ मधील सांजा येथील शेतकऱ्यांना प्रती टन २५०० रुपये भाव देण्याचे ठरवले होते. ठरल्याप्रमाणे दिले नसल्यामुळे उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी सांगा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे दि.७ ऑक्टोबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जवळपास १५० शेतकऱ्यांनी ३०० एकर ऊस कारखान्यास गाळपासाठी दिला. परंतू ठरल्याप्रमाणे भाव न देता प्रती टन २३०० रुपये भावाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली. तर उर्वरित प्रती टन २०० रुपये न देता शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याची केली आहे. कारखान्यावर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच होणाऱ्या आर्थिक फसवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करावी. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या न दिल्यास पंचेश्वर साखर कारखान्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावेळी सांजा येथील शेतकरी राकेश सुर्यवंशी, बालाजी सुर्यवंशी, विलास सुर्यवंशी, कल्याण सुर्यवंशी, धनाजी सुर्यवंशी, संताजी सुर्यवंशी, काकासाहेब पाटील, शरद दहिवडकर, दत्तात्रय सूशधर्यवंशी त्यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.