गुरु शिवाय जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही - शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी

गुरु शिवाय जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही - शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - ज्याप्रमाणे पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही. माशाशिवाय पाणी राहू शकत नाही. त्याप्रमाणे गुरु शिवाय माणूस राहू शकत नाही. मानव जातीच्या कल्याणासाठी गुरुची नितांत गरज असून, गुरु शिवाय जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही असे विचार (उज्जैन, कर्नाटक ) पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांनी जळकोट येथे आशिर्वचन देताना व्यक्त केले.
जळकोट येथील श्री सिद्धेश्वर मंदिर व कट्टीमठ संस्थान ट्रस्ट यांच्यावतीने जगद्गुरु श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य भागवतपाद महास्वामीजी यांची अड्डपालखी मिरवणूक, श्री सिद्धेश्वर देवस्थान कट्टीमट संस्थान ट्रस्टचे मठाधिपती श्री श्री श्री १०८ ष. ब्र. शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांचा ६१ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मठाच्या नूतन वास्तु निवास व श्री केदारलिंग मंदिर सांस्कृतिक भवनचे उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या धर्मसभेत जगद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी हे भक्तांना आशिर्वाद देताना सांगितले.
दि.२९ रोजी उज्जैन पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची भर पावसात संत गोरोबाकाका मंदिर येथून मठापर्यंत वाजत गाजत, भक्तिमय वातावरणात अड्डपालखी मिरवणूक करण्यात आली. अड्डपालखीचे आगमन होताच वरुणराजाने हजेरी लावली होती. संपूर्ण कार्यक्रम भर पावसात पार पडला. भर पावसातही नागरिकांची प्रचंड गर्दी होती. जगद्गुरु यांनी श्री केदारलिंगेश्वर देवालयात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या निधीतून बांधलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. श्री सिद्धेश्वर मंदिर संस्थान ट्रस्टच्यावतीने जगद्गुरूंचा व इतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. जगद्गुरु राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची तुलाभार करण्यात आली. दि.३० सप्टेंबर रोजी जळकोट मठाचे मठाधिपती शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त जगदगुरुंच्या चरण स्पर्शाने मस्तकाभिषेक, मंगळस्नान घालण्यात आले. यावेळी त्यांचे अभिष्टचिंतन सर्वांनी केले.
यावेळी सोलापूरचे खासदार श्री श्री श्री १०८ ष.ब्र . जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आ राणाजगजितसिंह पाटील, माजी दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी (नागणसूर), सिद्धाराम शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ (कलकेरी), अभिनव मुनिद्र शिवाचार्य महास्वामीजी (हलकर्टी), जय सिद्धेश्वर शिवाचार्य हिरेमठ (हिरुर), सिद्धेश्वर शिवाचार्य हिरेमठ (आळंद), प्रभूशांत महास्वामीजी(हत्ती कनमस), शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी (अणदूर), बसवराज शिवाचार्य शिवलिंगेश्वर हिरेमठ (नळदुर्ग), वेदमूर्ती डॉ. शिवयोगी शास्त्री होळी मठ (सोलापूर), राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी (नंदगाव), सुतुरेश्वर शिवाचार्य महास्वामीजी (अचलेर), माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक आलुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, जळकोटचे सरपंच अशोकराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत कदम, सोलापूरचे माजी नगरसेवक सुरेश तमशेट्टी, माजी सरपंच बंकटराव कदम, तमन्नप्पा माळगे, शोभाताई अंगुले, अलका हिडोळे,  रेखा माने, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र पाटील, कल्याणी साखरे, जीवन कुंभार, श्री सिद्धेश्वर देवस्थान मंदीर ट्रस्टचे सचिव बाबूराव पटणे, सिद्धय्या स्वामी, अनिल छत्रे, शिवराज यादगौडा, समस्त भक्त, ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !