व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग जिल्हा कार्याध्यक्षपदी पटेल
कळंब दि.८ (प्रतिनिधी) - देशपातळीवर पत्रकारांसाठी काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अकिब पटेल यांची नियुक्ती करण्यात आली.
पटेल यांच्या निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्याध्यक्ष जयपाल गायकवाड, प्रदेश सरचिटणीस के. अभिजीत, कोअर टीमचे चेतन कात्रे, हुंकार बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष अमर चोंदे, जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, डिजीटल विभागाचे जिल्हा अध्यक्ष वैभव पारवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यातील डिजिटल मीडिया विभागाची कार्यकारणी लवकरच घोषित करण्यात येणार असून ९५५२४ १६१८१ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.