कांदा अनुदानासाठी छावाचे शोले स्टाईल आंदोलन

कांदा अनुदानासाठी छावाचे शोले स्टाईल आंदोलन


परंडा दि.३० (प्रतिनिधी) - तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लावलेली थट्टा थांबविण्यासाठी छावा संघटना शोले स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेच्यावतीने तहसिलदारांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्य सरकारने मंजूर केलेले कांदा अनुदान मिळवण्यासाठी संघटना व परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मिळून दि.११ सप्टेंबर रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी सहाय्यक निबंध कार्यालयाकडून आम्हास आश्वासन देण्यात आलेे होते. परंतू एक महिना उलटूनी अनुदान न मिळाल्यामुळे दि. १० ऑक्टोबर रोजी करमाळा रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी देखील सहाय्यक निबंधक संजय जाधव यांनी जिल्हा निबंधक अधिकारी यांच्याशी फोनद्वारे बोलणे करून देऊन १५ दिवसांत अनुदान वितरित करणार असल्याचे आश्वासन दिले. परंतू आज या आंदोलनास २० दिवस पूर्ण झालेले असताना देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यास कांदा अनुदान मिळालेले नाही. तसेच परंडा तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी व पशुपालक मेटाकोटीस आलेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी त्वरित कांदा अनुदान वितरित करण्यात यावे. येत्या ८ दिवसांत कांदा अनुदान न मिळाल्यास छावा क्रांतीवीर सेना, ऊस व कांदा उत्पादक शेतकरी यांच्यावतीने
शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर छावा क्रांतीवीर सेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख अमर शेख,  जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे, तालुकाध्यक्ष सुधीर लटके, भाऊसाहेब रोडगे, पांडुरंग गरड, रावसाहेब शिंगारे, श्रीराम धनवे, राजेंद्र गरड, परसराम कोळी, संदीप गरड, संघर्ष साळुंके, अभिलाष सुर्यवंशी, जयदेव गरड, कृष्णा कदम, गणेश गरड, कालिदास म्हेत्रे, राहुल कोरे, वजीर शेख, धनंजय वाघमोडे, कालिदास गरड आदी आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !