खा राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन लातूर-पुणे इंटरसिटी सुरु

खा राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन लातूर-पुणे इंटरसिटी सुरु 

धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - धाराशिव व लातूर येथील रेल्वे प्रवाशांची हेळसांड लक्षात घेऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.८ ऑक्टोबर २०२० रोजी पश्चिम विभागीय रेल्वे बोर्डाच्या बैठकीमध्ये मागणी केली होती. तर दि.१२ मार्च २०२० रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हरंगुळ-धाराशिव-पुणे इंटरसिटी सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन ही रेल्वे गाडी सुरु करण्याची विनंती केली होती.

रेल्वे मंत्रालयाकडून हरंगुळ- धाराशिव-पुणे रेल्वे क्र.०१४८७/ ०१४८८ सुरु करण्यात येत असून ही रेल्वे गाडी धाराशिव व लातूरकरांच्या सेवेत सुरु होत आहे.‍ हरंगुळ-धाराशिव-पुणे ही रेल्वे गाडी येथून पुण्यासाठी दररोज दुपारी ३ वाजता निघेल. धाराशिव येथे दुपारी ४ वाजता पोहचून सायंकाळी ९ वाजता पुणे स्टेशन येथे पोहचेल. तर पुणे येथून लातूरसाठी ही गाडी सकाळी ६.१० वाजता सुटेल व हरंगुळ येथे दुपारी १२.५० वाजता पोहोचेल. या रेल्वे गाडीचा विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांना लाभ होणार आहे. दसरा व दसरा सणाच्या मुहुर्तावर ही रेल्वे गाडी सुरु झाल्यामुळे नागरीकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !