महाग्रामीण क्रेडिट एक्सपो कार्यक्रमास ग्राहकांचा प्रतिसाद

महाग्रामीण क्रेडिट एक्सपो कार्यक्रमास ग्राहकांचा प्रतिसाद

धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांच्या मार्गदर्शनानुसार दि.२७ ऑक्टोबर रोजी धाराशिव तालुक्यातील ८ शाखांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाग्रामीण क्रेडिट एक्सपो २०२३ कार्यक्रमास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या एक्सपोला धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तसेच अमृत एग्रो एजन्सीचे संचालक संजय मोदानी, धाराशिव जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष धनाजीराव आनंदे आदी उपस्थित होते. यावेळी धाराशिव तालुक्यातील ८ शाखांच्यावतीने अनेक ग्राहकांना In principal sanction letters , बैंकेचे AGM & RM लातूरचे क्षत्रिय व्यवस्थापक कामतकर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.  यावेळी कामतकर यांनी  बॅंकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती उपस्थित ग्राहकांना सांगितले. तसेच ग्राहकांच्या शंकांचे निराकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाढे यांनी तर उपस्थितांचे आभार मोरे यांनी मानले. यावेळी ग्राहकांकांनी विविध कर्ज योजनेबद्दल चौकशी करीत चर्चा  केली. या दरम्यान क्रेडिट एक्सपोच्या माध्यमातून ८ शाखांनी ९.०८ कोटी रुपयांची कर्ज प्रकरणे मिळविण्यात यश आले असून येणाऱ्या आगामी उत्सवाच्या काळात आणखी उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांजा शाखेचे शाखा व्यवस्थापक हुमने, आनंदनगर शाखाचे व्यवस्थापक मोरे यांनी यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !