कात्राबाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक अंडी दिवस साजरा

कात्राबाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक अंडी दिवस साजरा

परंडा दि.१३ (प्रतिनिधी) - पशुसंवर्धन विभागाच्यावतीने तालुक्यातील कात्राबाद येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अंड्याचे वाटप करुन जागतिक अंडी दिन दि.१३ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. 
 
विद्यार्थ्यांना अंड्याचे वाटप तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ इम्रान पल्ला व डॉ. आर.ए. जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ पल्ला यांनी प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी जागतिक अंडी दिवस साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना अंड्याचे महत्त्व पटवून अंड्यामध्ये असलेले घटक आणि मानवी शरीराला त्याचे असलेले महत्त्व, ताजे व शिळे अंडे कसे ओळखायचे ? हे देखील विद्यार्थ्यांना सांगितले. तर 
 डॉ जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना आपले शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी अंडी किती महत्वाची आहेत ? या संदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक कापसे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !