लातूर-पुणे इंटरसिटी पहिल्या रेल्वेचे शिवसेनेवतीने उत्साहात स्वागत

लातूर-पुणे इंटरसिटी पहिल्या रेल्वेचे शिवसेनेवतीने  उत्साहात स्वागत

धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - लातूर-पुणे इंटरसिटी पहिल्या रेल्वेचे शिवसेने (ठाकरे) च्यावतीने दि.१० ऑक्टोबर रोजी रेल्वेला पुष्पहार घालून तर रेल्वेच्या चालकांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून उत्साहात स्वागत करण्यात आले.
खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर लातूर-धाराशिव-पुणे इंटरसिटी रेल्वे अखेर सुरू झाली आहे.
धाराशिव व लातूर येथील रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन खा. राजेनिंबाळकर  यांनी पश्चिम विभागीय रेल्वे बोर्डाच्या बैठकीमध्ये मागणी केली होती. तर दि. १२ मार्च २०२० रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हरंगुळ-धाराशिव-पुणे इंटरसिटी सुरु करण्याची  मागणी लावून धरली होती. त्यानंतरही त्यांनी  रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

यावेळी युवा सेनेचे शहर प्रमुख रवि वाघमारे, बाळासाहेब काकडे, रवि कोरे, तुषार निंबाळकर, गजेंद्र जाधव, बंडू आदरकर, सुरेश गवळी, मनोज पडवळ, आबा पडवळ, सुमित बागल, मनोज केजकर, महेश लिमये, संकेत सूर्यवंशी, वैभव वीर, अफरोज पीरजादे, व्यंकटेश दिवाणे, गफूर शेख, साजीद सय्यद, मनोज मगर, प्रशांत सूर्यवंशी, राज निकम, महेश उपासे, मुजीब काझी, रुपेश शेटे, सतीश लोंढे, शहबाज पठाण, आसिफ शेख यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !