भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा
भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा
उमरगा दि.२१ (प्रतिनिधी) - तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित क्युनर्जी इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याचा ६ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नी प्रदीपन पुजन कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार व सविता बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
क्युनर्जी इंडस्ट्रीज लि. चे संचालक सचिन सिनगारे , भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, व्हा. चेअरमन पद्माकर हराळकर आदी उपस्थित होते. भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने सन २२ - २३ या वर्षात यशस्विपणे गाळप केलेले असून परिसरातील कारखान्यांपेक्षा सर्वाधिक दर वेळेत देण्याचे सातत्य यावर्षी देखील ठेवले आहे. सन २०२३ -२४ मध्ये हा कारखाना ६ हजार मे.टन क्षमतेने चालणार असून यावर्षी ६ लाख में.टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या गाळपसालामध्ये इथेनॉल निर्मिती, सह वीज निर्मिती हे उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया चालु असून हे प्रकल्प चालू झाल्यास शेतकऱ्यांना यापेक्षा जास्तीचा दर देण्यासाठी मदत होणार आहे. यावर्षी गाळप हंगामासाठी २६० ट्रक ट्रॅक्टर, २९० मिनी ट्रॅक्टर, २५० बैलगाड्या, ७ हार्वेस्टर अशी वाहन यंत्रणा उभारण्यात आली आहे. कारखाना वेळेत हप्ता देत असून जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करीत आहे. कारखान्याचा काटा तंतोतंत असल्याने वजनाबाबत अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती क्युनर्जीचे संचालक सिनगारे यांनी दिली. यावेळी संचालक युवराज कदम, इमाम पटेल, व्यंकटराव सोनवणे, अभिजित जाधव, तुकाराम बिराजदार, किसन पाटील,
जनरल मॅनेजर बी.जे. पाटील, चीफ इंजिनियर कुलदीप कावळे, चीफ केमिस्ट सुरज पांढरे, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नेताजी कवठे, भीमा स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, बापू बिराजदार, शमशोद्दीन जमादार, रमेश बिराजदार, कवलजीत बिराजदार, बलसुरच्या सरपंच जयश्री नांगरे, सोनाली सगर, डॉ. संजय अस्वले, मोहन शिंदे, समुद्राळचे सरपंच हणमंत कोकाटे, तात्याराव जाधव, नितिन कोराळे, कोंडजिगड वि. का. सोसायटीचे चेअरमन संतोष मुरटे, अमर बिराजदार, गोविंद पाटील, राजेंद्र जाधव, संजय रणखांब यांच्यासह सभासद व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------
परिसरातील कारखान्यांपेक्षा सर्वाधिक दर वेळेत देण्याची परंपरा कारखान्याने कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवुन गाळप क्षमताही वाढवली आहे. कारखान्याचा वजनकाटा तंतोतंत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल आहे. कारखान्याचे इतर उत्पादन युनीट चालु करण्याचे काम पुर्ण होत आले असून याचा फायदा शेतकऱ्यांना वाढीव दराच्या रूपाणे होणार आहे. मागील हंगामाप्रमाणे यावर्षी देखील शेतकऱ्यांनी गाळपासाठी मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला द्यावा असे आवाहन चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी केले.