भाजपने धाराशिव लोकसभेची संधी दिली तर जिल्ह्याचा विकास करणार - मंगरुळे

भाजपने धाराशिव लोकसभेची संधी दिली तर जिल्ह्याचा विकास करणार - मंगरुळे

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभेसाठी मला उमेदवारी दिली तर मी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करीन असे आश्वासन भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरूळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.३ ऑक्टोबर रोजी केले.
धाराशिव शहरातील हॉटेल जत्रा फंक्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड खंडेराव चौरे उपस्थित होते‌. पुढे बोलताना मंगरुळे म्हणाले की, मी भारतीय जनता पार्टीमध्ये १९९७ पासून काम करीत असून भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. तर छत्रपती संभाजीनगरचा भाजपच्या जिल्हा कोषाध्यक्ष या पदापासून ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून योगदान दिलेले आहे. मी छत्रपती संभाजीनगर येथे श्रीयश प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक क्षेत्रात काम केले व करीत आहे. या माध्यमातून दरवर्षी धाराशिव जिल्ह्यातील ४०० मुलांना प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरी उपलब्ध करून दिली आहे. तर धाराशिव लोकसभा मतदारसंघातील २७३ गावातील नागरिकांचे आधार काढण्यासाठी ३७५ शिबिरे घेऊन नागरिकांना आधार कार्ड काढून दिलेली आहेत. तसेच जिल्ह्यात जे पिकते ते विकले पाहिजे यासाठी विकण्याचे कौशल्य तरुणांनी आत्मसात केल्यास तरुणांना नक्की रोजगार मिळेल असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी पोषक वातावरण असून दूध प्रक्रिया उद्योग सिबिल चांगले असणाऱ्या तरुणांनी उभा करावेत. त्यांना मी राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करीन असे त्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे तरुणांना व्यवसायात उतरवल्याशिवाय विकास होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर शेती व शेतीला पूरक धंदे आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या नेत्यांची माझा संपर्क असून मला योग्य संधी मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !