लातूर येथील लिंगायत महामोर्चामध्ये सहभागी व्हावे
लातूर येथील लिंगायत महामोर्चामध्ये सहभागी व्हावे
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्यावतीने लातूर येथे दि.३० ऑक्टोबर रोजी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या लिंगायत महामोर्चामध्ये जास्तीत जास्त लिंगायत समाज बांधव व शिवा मावळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी होऊन इतिहास घडवावा असे आवाहन शिवा संघटनेचे मराठवाडा सरचिटणीस सुनील शेरखाने, जिल्हाध्यक्ष संजय गिराम, जिल्हा उपाध्यक्ष नितीन लगदिवे, शिवा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष समाधान भोरे, शिवा संघटनेचे शहराध्यक्ष महेश उपासे, सुरज सगरे यांनी केले आहे.