नवोदय विद्यालयात गांधी व शास्त्री जयंती साजरी
नवोदय विद्यालयात गांधी व शास्त्री जयंती साजरी
तुळजापूर दि.२ (प्रतिनिधी) - येथील जवाहर नवोदय विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती दि.२ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह व विद्यार्थी यांच्या हस्ते या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रोहित पांचाळ, तनिष्का मगर व संजना चौगुले या विद्यार्थिनींनी बापूजी व शास्त्रीजी यांच्या कार्यावरती आपले विचार व्यक्त केले. तर प्राचार्य सिंह यांनी महात्मा गांधी हे अहिंसा, सत्याचे पुजारी कसे पुजारी होते ? यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार डॉ. सतीश महामुनी वरिष्ठ अध्यापक सुर्यकांत गायकवाड, श्रीहरी जाधव, धनाजी देशमुख आदी उपस्थित होते.