सोनार व क्षिरसागर यांचा सेवा निवृत्तीनिमित निरोप समारंभ
तुळजापूर दि.३ (प्रतिनिधी) - नगर परिषद कर्मचारी महादेव सोनार व सुभाष क्षिरसागर हे सेवेतून वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त नगर परिषद कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येऊन निरोप दि.३ ऑक्टोबर रोजी देण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक अमर मगर आदी उपस्थित होते. दोन्ही कर्मचाऱ्यांची सेवा ३० वर्षापेक्षा अधिक काळ झालेली असून त्यांनी नगर पालिकेच्या विविध भागांमध्ये काम केल्याचे रोचकरी यांनी सांगितले. तर मगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अधीक्षक वैभव पाठक, संघटनेचे अध्यक्ष दत्ता साळुंखे, लेखापाल अमित खेलाले यांनी परिश्रम घेतले. यावेळी माजी नगरसेवक अमर हंगरगेकर, नगर अभियंता अशोक सनगले, प्रफुल्लता बरुरकर, बापू रोचकरी, नागेश काळे, बालाजी जाधव आदींसह कर्मचारी उपस्थित होते.