स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे - आ पाटील

स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे - आ पाटील


    
नळदुर्ग दि.१ (प्रतिनिधी) - समृध्द व सशक्त भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्‍छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन आ राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.१ ऑक्टोबर रोजी केले.

भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्यावतीने आयोजित 'स्वच्छतेसाठी एक तास" या कार्यक्रमा प्रसंगी आमदार पाटील बोलत होते. आज सकाळी १० ते ११ या वेळेत नळदुर्ग किल्ल्यातील उपली बुरुज आणि पाणी महाल परिसराची स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, कृषी अधिकारी सचिन चव्हाण, प्राचार्य डॉ एस एस राठोड, मुख्याध्यापक सुनील पुजारी, क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव, पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे, सचिव देविदास पाठक, सहसचिव अब्दुल लतीफ, उपाध्यक्ष गणेश वाघमारे, सदस्य बाबा गुळीग, अभिमान हंगरकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ पाटील म्हणाले की, Cleanliness is next to Godliness या महात्मा गांधीच्या घोषवाक्यानुसार मानानीय पंतप्रधान यांनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन ‘स्वच्छ भारत अभियानाची’ घोषणा केली. आणि या अभियानात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत आहेत. यावेळी परिसरात पडलेले प्लास्टिक बॉटल, रपर्स विद्यार्थ्यांकडून गोळा करण्यात आले. या उपक्रमात राज्य पुरातत्व विभाग, नगर परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला बचत गट, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, धरित्री विद्यालय आणि पर्यटन जनजागृती समितीचे कार्यकर्ते आदी शासकीय आणि निमशासकीय संस्था सहभागी झाले होते.
                                                                    

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !