अखेर तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव दरवाजा उघडलाच ! १३ वर्षापासून बंद होता दरवाजा


अखेर तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव दरवाजा उघडलाच !


१३ वर्षापासून बंद होता दरवाजा


धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - श्री तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव मंदिराकडील दरवाजा दिव्यांग व वयोवृद्ध भाविकांना मंदिरात प्रवेश करता यावा व बाहेर जाण्यासाठी आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत दि.१३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडला आहे. हा दरवाजा उघडण्याचे आदेश मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिले आहेत.


श्री तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव मंदिराकडील दरवाजा उघडण्याची मागणी भाविक व स्थानिक पुजारी यांच्याकडून वारंवार होत असल्यामुळे विश्वस्त समितीची सभा दि.२० सप्टेंबर २०२३ रोजी ठराव क्रमांक १७.०१ अन्वये श्री तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव मंदिराकडील दरवाजा भाविकांसाठी खुला करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले. त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. श्री तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव मंदिराकडील दरवाजा दिव्यांग व वयोवृद्ध भाविकांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर जाण्यासाठी उघडण्यात यावा. तर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येवून या मार्गावर रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी. तसेच या दरवाज्यावर सकाळी चरणतीर्थ झाल्यापासून रात्री प्रक्षाळ होईपर्यंत २ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार टोळभैरव दरवाजा उघडण्यात आला आहे.


------------------------------------- 

एटीएस आणि एसआयडी यांनी अहवाल दिला होता. हा दरवाजा मंदिराच्या बाजुला असल्यामुळे सुरक्षेच्या कारणावरुन बंद करण्यात आला होता. दि.१३ ऑक्टोबर रोजी दरवाजा उघडला आहे याला आमची परवानगी नाही. जिल्हाधिकारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आहेत. हा विषय त्याच्या अखत्यारितला आहे. आम्ही पुन्हा अहवाल पाठवणार आहोत अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.


------------------------------------- 

फार वर्षापूर्वी पोलिसांनी मंदिरात तपासणी केली होती. त्यावेळी मंदिरात अतिरेकी आले अशी अफवा पसरली होती. प्रत्यक्षात तसे घडलेच नव्हते. फक्त अफवा होती. तो दरवाजा बंद करण्याचे आदेश कोणी दिले होते ? हे आम्हाला अद्यापपर्यंत माहित नाही. केवळ अफवेमुळे हा दरवाजा गेली अनेक वर्षे बंद होता अशी माहिती पाळेकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी सांगितली.



Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !