भाजप कामगार मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी भालेराव
भाजप कामगार मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी भालेराव
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या सचिवपदी आनंद भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे संघटन वाढवावे. तसेच विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व जास्तीत जास्त कामगारांना भाजपामध्ये सामील करण्यासाठी अथक परिश्रम घ्याल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.