दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या पठाण दांपत्यांचा सत्कार
दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या पठाण दांपत्यांचा सत्कार
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - रोटरी क्लब उस्मानाबादच्यावतीने आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त दोन मुलींवर कुटूब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या दांपत्याचा सत्कार करण्यात दि.११ ऑक्टोबर रोजी करण्यात आला.
धाराशिव येथील रोटरी नेत्र रुग्णालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलींची आई आमेना गौस पठाण व वडील यांनी दोन मुली झाल्यावर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेतली आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे २०२३-२४ या वर्षाचे असिस्टंट गव्हर्नर डॉ संजय अस्वले, रोटरीच्या अध्यक्षा अनार साळुंके आदी उपस्थित होते.