परंडा येथे गांधी व शास्त्री यांची जयंती साजरी
परंडा येथे गांधी व शास्त्री यांची जयंती साजरी
परंडा दि.२ (प्रतिनिधी) - राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग उद्योग समुह यांच्यावतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे, माजी जिल्हाप्रमुख केदार सौदागर, तालुकाप्रमुख आप्पासाहेब तरटे, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश गुडे, शहर प्रमुख जमीर सिकलकर, युवाध्यक्ष तय्यब शेख, दिव्यांग समूह अध्यक्ष तानाजी घोडके, शहर प्रमुख गोरख देशमाने, वैद्यकीय अधिकारी डॉ.अबरार पठाण, तालुका अल्पसंख्याक अझरुद्दीन शेख, तालुका संपर्कप्रमुख महेश खराडे, सचिव महेश पारेकर, महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मी शिंदे, बालाजी गंभीरे, दत्ता काशिद, गोवर्धन खरात, तानाजी घोडके, अमोल जोशी, अक्षय उदागे, सोहेल शेख, निहाल शिकलकर, बाबा शिकलकर, रमजान शिकलकर, सचिन शिंदे, मुनील शिकलकर, नाना देशमुख ,अनिल पवार आदींसह उपस्थितांनी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व परिसर स्वच्छ केला.