शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या अध्यक्षपदी जयराज खोचरे तर सचिवपदी आकाश कोकाटेसन २०२३-२४ ची नूतन कार्यकारिणी जाहीर
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या अध्यक्षपदी जयराज खोचरे तर सचिवपदी आकाश कोकाटे
सन २०२३-२४ ची नूतन कार्यकारिणी जाहीर
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या अध्यक्षपदी जयराज रंगनाथराव खोचरे यांची तर उपाध्यक्षपदी गौरव अशोकराव बागल यांची तसेच कार्याध्यक्षपदी देवानंद सुरवसे यांची तर सचिवपदी आकाश मिलींदराव कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच २०२३-२४ च्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी दि.२९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत.
धाराशिव शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात या समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक धर्मराज सुर्यवंशी, शशिकांत खुने व उल्हास उर्फ बुबासाहेब उंबरे यांच्या अध्यक्षतेखाली व मेजर अच्युत थोरात, सुनील मिसाळ, संतोष घोरपडे, योगेश आतकरे व दत्तात्रय साळुंके यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये समितीच्या सहकार्याध्यक्ष संतोष चोपडे, संघटक हनुमंत यादव, सहसंघटक विलास साळुंके, कोषाध्यक्ष गणेश पवार, सहकोषाध्यक्ष महेश अनपट, प्रवक्ता विशाल पाटील,
सहप्रवक्ता सिध्देश्वर मते, प्रसिध्दी प्रमुख, सुरज शेरकर, सहप्रसिध्दी प्रमुख कुंदन जानराव, सोशल मिडीया समीर शेख, सोशल मिडीया प्रसाद वीर व कायदेशीर सल्लागार म्हणून धैर्यशील सस्ते या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा फेटा बांधून नियुक्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर निवडून नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सिद्धेश्वर मते यांनी मानले. यावेळी समितीचे सदस्य व शिवप्रेमी मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.