समाज कल्याणच्यावतीने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
समाज कल्याणच्यावतीने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - जागतिक जेष्ठ नगरिक दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक, पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.
धाराशिव शहरातील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सकाळी १० वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमचे उद्घाटन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छता मोहिमचे कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते. सदर स्वच्छता मोहिमा अंतर्गत कार्यालयाच्या परिसरात वृक्षरोपण करुन समारोप करण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात स्वातंत्र्य सेनानी भास्कर नायगावकर यांच्या अध्यक्षेखाली जागतिक जेष्ठ नगरिक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हभप अडसूळ महाराज व प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. विशाल गरड, भोयटे, सुफी सय्यद, उमाकांत नायगावकर, सेवानिवृत्त न्यायाधीश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अंबादास दानवे, बळीराम जगताप आदींसह महिला, नागरिक उपस्थित होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच बिगर सरकारी संस्थाचे गौरव व जेष्ठ नागरिकांचे कार्यशाळा, चर्चासत्र तसेच जेष्ठ नगरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन मुख्याध्यापक बी यु जगताप यांनी तर उपस्थितांचे आभार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब अरवत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाज कल्याण निरिक्षक युवराज भोसले, अतुल जगताप, बिभीषण सिरसट, युवराज चव्हाण, संकेत जगताप यांनी परिश्रम घेतले.