डॉ जगदाळे यांची पशुधन विकास अधिकारीपदाला गवसणी पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश
डॉ जगदाळे यांची पशुधन विकास अधिकारीपदाला गवसणी
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक पोलीस निरीक्षक कन्या असलेल्या डॉ स्नेहा जगदाळे यांनी पहिल्याच प्रयत्नात थेट पशुधन विकास अधिकारीपदाला गवसणी घालीत यश संपादन केले आहे. त्यामुळे डॉ जगदाळे यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते दि.२८ ऑक्टोबर रोजी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकारी वर्ग- १ या परीक्षेत डॉ. स्नेहा फुलचंद जगदाळे हिने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे.
डॉ. स्नेहा फुलचंद जगदाळे यांचे प्राथमीक शिक्षण हे श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव ,उच्च माध्यमीक शिक्षण राजर्षी शाहू माहाविद्यालय लातूर येथे झाले आसून पदवीचे शिक्षण पशुवैद्यकिय महाविद्यालय नागपूर व पदव्युत्तर शिक्षण पशुवैद्यकिय महाविद्यालय परभणी येथे झाले आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत फुलचंद जगदाळे यांची कन्या आहेत. याबद्दल डॉ जगदाळे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.