पत्रकारांनी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांच्या मनमानी कारभाराचा केला जाहीर निषेध ! आतील गौडबंगाल बाहेर येऊ नये यासाठी अटहास ?तत्कालीन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उठवली होती प्रवेश बंदी !
पत्रकारांनी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांच्या मनमानी कारभाराचा केला जाहीर निषेध !
आतील गौडबंगाल बाहेर येऊ नये यासाठी अटहास ?
तत्कालीन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उठवली होती प्रवेश बंदी !
धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सातत्याने प्रवेश दिला जात नाही. एकीकडे देशाच्या संसद व राज्याच्या विधानसभा या ठिकाणी सुरू असलेल्या अधिवेशन व इतर बैठकांसाठी पत्रकारांना थेट लाईव्ह करण्याची परवानगी आहे. तेथे काय काम काय चालते काय निर्णय घेतले जातात व कशा पद्धतीने एकमेकांमध्ये हमरी तुम्ही होते हे चव्हाट्यावर आणण्याचे काम पत्रकारच निपक्षपाती पण करीत असतात. त्यामुळेच देशाच्या व राज्याच्या कारभाराची माहिती सर्वसामान्य जनतेला सहजासहजी उपलब्ध होते व होत आहे. मात्र जिल्हास्तरीय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जातात. त्यासाठी निधी कसा उपलब्ध करून दिला ? त्याला कोणी विरोध केला ? तो विरोध करताना काही खडाजंगी झाली का ? तसेच एखाद्या अधिकाऱ्याने मागील निर्णयाची अंमलबजावणी केलेली नसेल तर त्यावर काय उचित कारवाई केली किंवा करण्याचे निर्देश दिले गेले ? शिवाय या बैठकीमध्ये खरोखरच जिल्ह्याच्या विकासाचे निर्णय घेतले जातात की नाही ? केवळ औपचारिक चर्चा करण्यापूर्वी बैठक आयोजित केली जाते. या सर्वांचा सविस्तर वृत्तांत दैनिक इलेक्ट्रॉनिक व सोशल माध्यमाचे पत्रकार अपडेट खबर आपापल्या माध्यमातून नि:ष्पृह भावनेने देण्याचे काम करतात. याला अपवाद फक्त तत्कालीन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचा आहे. कारण त्यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून पत्रकारांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस येण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे या बैठकीतील सर्व घडामोडी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यास पत्रकारांना कोणतीही अडचण येत नव्हती. मात्र त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रत्येक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पत्रकारांना प्रवेश न देण्याचे धोरण अवलंबिवले जात आहे. यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे, बालाजी निरपळ, सयाजी शेळके, हुंकार बनसोडे, संतोष जाधव, सतीश मातने, सुधीर पवार, शीला उंबरे, चेतन धनुरे, आकाश नरोटे, अमजद सय्यद, मच्छिंद्र कदम, विनोद बाकले, वैभव पारवे, अजित माळी, किरण कांबळे, सलीम शेख, कुंदन शिंदे, बालाजी सुरवसे, ओंकार कुलकर्णी, अजहर शेख,अभय ओव्हाळ, स्वप्नील लष्कारे, राहुल कोरे आदींसह पत्रकार सहभागी झाले होते.