अशोका विजया दशमीनिमित सम्राट अशोकास अभिवादन
अशोका विजया दशमीनिमित सम्राट अशोकास अभिवादन
धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - अशोका विजयादशमीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने सम्राट अशोकास दि.२४ ऑक्टोबर रोजी अभिवादन करण्यात आले.
धाराशिव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील व पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. तर २२ प्रतिज्ञांचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष विजयमाला सुरेश धावारे, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सरतापे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी.डी. शिंदे, जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, जिल्हा कोषाध्यक्ष राजश्री कदम, केंद्रीय शिक्षक गुणवंत सोनवणे, ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार गायकवाड, एम.जी. पवार, प्रा.महेंद्र चंदनशिवे, समता सैनिक दलाचे तालुका सचिव सचिन दिलपाक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विद्यानंद वाघमारे यांनी तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार विजय बनसोडे यांनी मानले. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष विश्वास पांडागळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे, तालुका सरचिटणीस उमाजी गायकवाड, तालुका कोषाध्यक्ष शिवाजी गायकवाड, जिल्हा संघटक मीनाताई लागाडे, जिल्हा हिशोब तपासणी देविदास कदम, कार्यालय सचिव महादेव एडके, तालुका संस्कार उपाध्यक्ष दिनकर झेंडे, तालुका पर्यटन सचिव धनंजय वाघमारे, तालुका समता सैनिक दल सचिव स्वराज जानराव, सुदर्शन ओहाळ, बाबासाहेब कांबळे, मुकेश मोठे, रिपाइंचे रंजीत गायकवाड, सोमनाथ गायकवाड, बलभीम वाघमारे, बापू कुचेकर, रमेश कांबळे, संग्राम बनसोडे, ऍड.के.टी गायकवाड, विद्याताई वाघमारे, अंकुश उबाळे, सोहन बनसोडे, चंद्रकांत मस्के, प्रशांत बनसोडे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका होते. तर कार्यक्रमाची सांगता खीरदानाने करण्यात आली.