गावात शाश्वत स्वच्छता राहण्यासाठी प्रत्येकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा - खंदारे
गावात शाश्वत स्वच्छता राहण्यासाठी प्रत्येकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा - खंदारे
धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - स्वच्छता ही सेवा उपक्रमातुन गावात शाश्वत स्वच्छता टिकुन राहणेसाठी प्रयत्न केले जात असुन, गावात शाश्वत स्वच्छता राहण्यासाठी प्रत्येकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी दि.१ ऑक्टोबर रोजी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी स्वच्छ भारत दिवसाच्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत कचरामुक्त भारत थीम असलेला स्वच्छता ही सेवा उपक्रम स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री मोदी यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात व्यापक स्वरूपात १ ऑक्टोबर रोजी १० वाजता १ तास स्वच्छतेसाठी श्रमदान आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने जिल्हास्तरावर जिल्हा परिषद इमारत परिसरात स्वच्छतेसाठी श्रमदान आयोजित करण्यात आले होते. खंदारे हे उपस्थित राहून स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेत सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचे संकल्पनेतून स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या निर्देशांकाचे प्रकाशन करण्यात आले. पुढे बोलताना खंदारे म्हणाले की, स्वच्छतेच्या उपक्रमांतून स्वच्छता चळवळ घराघरात पोहचली पाहिजे. जन आंदोलन उभे राहिले पाहिजे यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. यातून योजनेचे अंतिम ध्येय साध्य करावे. त्यामुळे गावात शाश्वत स्वच्छता राहण्यास मदत होऊ शकेल. तसेच गाव हाणदारीमुक्त अधिक होण्यासाठी वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर, सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर, वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर घनकचरा व सांडपाणी व्य्वस्थापन प्रकल्पातून सांडपाणी, ओला व सुका कचरा, प्लावस्टिक कचरा व्यावस्थापन याविषयी गुणवत्तापुर्ण उपाययोजना गावात निर्माण कराव्यात असे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रांजल शिेंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत ढवळशंख, उपमुख्यं कार्यकारी अधिकारी डी.एम. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास, कार्यकारी अभियंता संजय ढवळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कुलदिप मिटकरी, उपशिक्षणाधिकारी (प्रा.) शिवाजी फाटक आदीसह जिल्हा परिषदेतील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
जिल्ह्यातील ७२० गावांमध्ये गावात रस्त्याच्या कडेची स्वच्छता, पानवटे, झोपडपट्टया, बाजाराची ठिकाणे, प्रार्थना स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांच्या आजूबाजूंचे परिसर, पर्यटकांची ठिकाणे, बस स्थानक, आरोग्य संस्था आणि लगतचे क्षेत्र, अंगणवाड्या भोवतालची स्वच्छता, शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता अशा ठिकाणी स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले आहे. श्रमदान झाल्यानंतर उपक्रमांचे फोटो पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. तर या स्वच्छतेसाठी श्रमदान उपक्रमावेळी ग्रामस्थांनी स्वच्छतेबाबत शपथ घेतली. तसेच धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडी येथे १ ऑक्टोबर १० वाजता, १ तास स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेत जिल्हा परिषेदेच्या प्रकल्प संचालिका प्रांजल शिेंदे, विभागीय आयुक्त कार्यालयातील गट विकास अधिकारी आर.एस. महाजन व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत ढवळशंख यांनी सहभाग नोंदवून ग्रामस्थांसोबत श्रमदान केले. यावेळी नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.