धाराशिव बस आगारमध्ये राबविली स्वच्छता मोहीम

धाराशिव बस आगारमध्ये राबविली स्वच्छता मोहीम 

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम धाराशिव आगारमध्ये  राबविण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ दीक्षित एस टी आगार प्रमुख संतोष कोष्टी, गुप्त वार्ता विभागाचे रवींद्र कराड, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक , मुकेश कोमठवार, आगार प्रमुख बाळासाहेब कदम, वाहतूक निरीक्षक राकेश जानराव, कुलदीप सावंत,  डॉ.बाळासाहेब मैंद व प्रा.डॉ. मकरंद चौधरी आदी उपस्थित होते. एसटी वर्कशॉप बस स्थानक जिल्हा स्त्री रुग्णालय येथील स्वच्छता करण्यात आली. यावेळी विविध कॉलेजचे कार्यक्रमाधिकारी, प्राध्यापक, रासेयो.शचे स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थीनी यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी कोठावळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आज सकाळी १० ते ११ या वेळेमध्ये जी स्वच्छता मोहीम राबवली गेली. ती  सार्वजनिक स्वच्छता आहे. परंतू आज गरज आहे ती स्वयंम स्वच्छतेची, मनाच्या स्वच्छतेची स्वच्छतेची व सामाजिक स्वच्छतेची, आरोग्य, व्यसनमुक्ती, सामाजिक बांधिलकी, स्वयं निर्भर व्हावे असे सांगितले. तर दि.१ ते १३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपूर्ण देशात शाळा, बस स्थानक, महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी आर.पी. कॉलेज, व्यंकटेश महाजन कॉलेज, तेरणा कॉलेज, क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील समाजकार्य महाविद्यालय, बी फार्मसी कॉलेज व स्वयंसेवक विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !