पालकमंत्री डॉ सावंत आज जिल्हा दौऱ्यावर
पालकमंत्री डॉ सावंत आज जिल्हा दौऱ्यावर
धाराशिव.दि.१२ (प्रतिनिधी) - राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत हे उद्या दि ऑक्टोंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
ते दि.१३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजता पुणे येथील कात्रज पूणे येथून मोटारीने धाराशिवकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता पालकमंत्री कार्यालय धाराशिव येथे आगमन व राखीव. दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील आगमन व बैठकीस उपस्थिती. तुळजापूर येथे होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सव २०२४ व नियोजित महाआरोग्य शिबीर पूर्व तयारीबाबत बैठक तसेच टंचाई आढावा बैठक. दुपारी ३ वाजता धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण. दुपारी ३.३० वाजता तुळजापूर येथे आगमन व महाआरोग्य शिबीर स्थळ पाहणी. तुळजापूर देवस्थान संस्थानाचे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. सायंकाळी ४.३० वाजता तुळजापूर मंदिर येथे दर्शन तर सायंकाळी ४.४५ वाजता तुळजापूर येथून सोलापूर मार्गे कात्रज-पुण्याकडे प्रयाण करतील.