रामदास कोळगे यांचा भाजपाच्यावतीने सत्कार
रामदास कोळगे यांचा भाजपाच्यावतीने सत्कार
धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी व धाराशिव लोकसभा समन्वयपदी रामदास कोळगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन दि.२१ ऑक्टोबर रोजी सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड अनिल काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रभाकर मुळे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, जिल्हा सचिव विकास कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, दत्ता सोनटक्के, पिराजी मंजुळे, ओंकार देवकते लोकमंगल बँकेचे व्हा चेअरमन बालाजी शिंदे आदी उपस्थित होते.