कुंभारी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
तुळजापूर दि.१४ (प्रतिनिधी) - ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील नालंदा बुद्ध विहारात विश्वरत्न, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी दिलपाक प्रतिष्ठानचे संकेत दिलपाक, बाबा दिलपाक, मनोज दिलपाक आदी उपस्थित होते .