भाजपच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा जोडे मारुन, प्रतिमा जाळून केला निषेध

भाजपच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा जोडे मारुन, प्रतिमा जाळून केला निषेध

धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) - येथे भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नाना पटोले तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दि.२१ ऑक्टोबर रोजी प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारुन दहन‌ करीत निषेध करण्यात आला.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी भरती संदर्भात जो शासकीय आदेश काढून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय, दिशाभूल करणारा होता. तो शासकीय आदेश महाराष्ट्रातील धोरणात्मक निर्णय व जनतेसाठी सकारात्मक काम करण्यासाठी  सध्याच्या महायुती सरकारने रद्दबादल करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे होणारी मोठी हानी टाळली असल्याचा आनंद करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे, इंद्रजीत देवकते, विकास कुलकर्णी, मकरंद पाटील, दत्ता सोनटक्के, अभय इंगळे, प्रमोद पाटील, रमण जाधव, उदय देशमुख, वैभव हंचाटे, सिद्धूजीराजे निंबाळकर, पांडुरंग लाटे, आनंद भालेराव, अमोल राजेनिंबाळकर,  गणेश इंगळे, संदीप इंगळे, रोहित देशमुख, आप्पा नाईकवाडी, पुष्पकांत माळाळे, गणेश एडके, अमित कदम, प्रसाद मुंडे, मेसा जानराव, धनराज नवले, ओंकार देवकते, वेंकट कोळी, नवनाथ सोलंकर ,सुनील पंगुडवाले, किशोर पवार, अजय उंबरे, अक्षय विंचुरे, निरंजन जगदाळे, विजय पवार, शंकर मोरे, बिन्नी तावस्कर यांच्या सह भाजप व युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !