साडेतीन शक्तिपीठांतील कुंकांसह साहित्यांचे घरोघरी होणार वाटप

साडेतीन शक्तिपीठांतील कुंकांसह साहित्यांचे घरोघरी होणार वाटप

धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) -  शहरातील बाळासाहेब ठाकरेनगर येथील नवरात्र महोत्सव समितीच्यावतीने घटस्थापनेसाठी साडेतीन शक्तीपीठातील कुंकांसह घटस्थापना, ओटीभरण व पूजाविधीचे साहित्य भेट देण्यात येणार आहे. यावर्षी महिला भाविकांसाठी महत्वाच्या शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत साळुंके यांनी दिली.
धाराशिव येथील ठाकरेनगर शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा देखावा यावर्षी तयार करण्यात आला आहे. तर यंदा घटस्थापनेपासून घटोथापनापर्यंत सर्व धार्मिक विधी दुर्गांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम तसेच उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण व तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !