आज वाॅक फाॅर फ्रीडम निमित्त रॅलीचे आयोजन
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - जनसाहस फाऊंडेशन, व्हीजन रेस्क्यू आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव शहरामध्ये मानवी तस्करी आणि आधुनिक काळातील गुलामगिरी विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावरील वॉक फॉर फ्रीडम कार्यक्रमाचे आयोजन दि.१४ ऑक्टोबर रोजी केले आहे.
महाविद्यालये, कॉर्पोरेट्स आणि मानवाधिकार स्वयंसेवी संस्थां आणि भारतातील १०० ठिकाणी, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सामाजीक ठिकाणी जागरुकता वॉक आयोजित करत आहे. वॉक फॉर फ्रीडम हा मानवी तस्करीच्या विरोधात जागरुकता निर्माण करणारा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. जो ५० देशांमधील ६०० ठिकाणी एकाच वेळी होत आहे. मानवी तस्करीमुळे शिकार झालेल्या आणि बळीं झालेल्या लोकांसाठी एकजुटीने येऊन त्याच्यासाठी आवाज बनण्यासाठी ही मूक पदयात्रा आहे. या पदयात्रेस सकाळी ८ वाजता जिल्हा परिषद कन्या शाळा येथून सुरुवात होवून संत गाडगेबाबा महाराज चौक,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छञपती शिवाजी महाराज चौक येथून परत याच मार्गावरून कन्या शाळा येथे समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने विध्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.