न्यायासाठी अबला माय-लेकींचे आमरण उपोषण अबला महिलेला गुंडाकडून मारहाण गावगुंडास पोलीस प्रशासनाचे अभय ?

न्यायासाठी अबला माय-लेकींचे आमरण उपोषण

अबला महिलेला गुंडाकडून मारहाण

गावगुंडास पोलीस प्रशासनाचे अभय ?

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - अबला असलेल्या पत्नी व मुलीस स्वतः पती- बाप इतर दोन पुरुष व तीन महिलांच्या मदतीने २०२१ पासून सातत्याने त्रास देत आहे. त्यांना मारहाण करून त्यांची जमीन बळकवण्याचा प्रयत्न चालवला आहे. या प्रकरणी आबला व हत्पल झालेल्या महिलांनी पोलीसांकडे वारंवार न्याय देण्याची केविलवाणी धडपड करीत याचना केली. मात्र गेंड्याचे कातडे पांघरलेल्या व्यवस्थेला घाम फुटला नाही. न्याय देण्याच्या मागणीसाठी त्या दोघी मायलेकींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. परंतू अद्यापही त्यांच्याकडे कोणीही फिरकले नाही हे त्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्याच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.

कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील अबला असलेल्या रत्नमाला व मुलगी अश्विनी या माय- लेकीस पिंपळगाव (डोळा) येथील राजेंद्र दत्तु टेकाळे व बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील व्यंकट इंगोले तसेच इतर २ पुरुष व ३ महिला त्यांच्या घरी घेऊन शिवीगाळ व मारहान करून जिवे मारुन टाकण्याच्या धमकी देऊन जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबाबत रत्नमाला इंगोले यांनी दि.२ सप्टेंबर २०२१ रोजी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. तसेच संबंधित कळंब पोलीस ठाणेव जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील धाव घेतली. मात्र यंत्रणेला घामाचा पाझर फुटलाच नाही. त्यामुळे संबंधित आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. रत्नमाला इंगोले त्यांच्या मालकीच्या गट नं. ५० मध्ये वास्तव्यास त्या मुलाबाळासह राहत आहेत. त्यांना २०२१ पासून जिवे मारुन जमीन हडप करण्याच्या धमक्या गावातील राजेंद्र दत्तु टेकाळे हा वारंवार शिवीगाळ व मारहान करत आहे. तसेच रात्री अपरात्री गुंड लोक घेऊन घरावर दगडफेक करतो. तसेच तो म्हणतो की, मला तुम्हाला मारण्याची एक लाख रुपयांची सुपारी घेतली आहे व तुम्हाला मारुन तुमच्या विरोधात जो कोर्टात दावा नं. आर.सी.एस./ १२५९/२०२२ दिला आहे. तो आमच्या सांगण्यावरुन दिला आहे. तुम्हाला मारुन तुमची जमीन त्या बाईला मिळवून देवू व सुपारी दिलेल्या व्यक्तीला ती जमीन खरेदी देवू अशी धमकी देत आहे. तसेच दि.३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर येऊन म्हणाला की, तुम्हाला मारुन टाकण्यासाठी ६ माणसे व इतर २ बाया व तुझा नवरा हा केज ता. केज जि. बीड येथून येणार आहेत असे म्हणत त्याने त्या अबला महिलेला लाथा बुक्यांनी मारहान करीत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर लगेच सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास माझे पती व्यंकट रामभाऊ इंगोले हे तीन चाकी रिक्षामध्ये तीन महिला व दोन पुरुष यांना घेऊन माझ्या घरासमोर आले व शिवीगाळ करत मला लाथाबुक्यांनी मारहान केली. तर ते म्हणाले की, मला राजेंद्र दत्तु टेकाळे यांनी केजमधून बोलवून घेतले आहे व तुला मारण्यासाठी आम्हाला सुपारी दिलेली आहे. व तूला वाटून दिलेली जमीन व तू खरेदी केलेली जमीन हडप करु असे म्हणून पिंपळगाव (डो.) कडे रिक्षा घेऊन गेले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !