मणिपूरचा वाद भूप्रदेशावरून, धर्मापेक्षा वंश व जमात श्रेष्ठ मानतात - पाटोळे
मणिपूरचा वाद भूप्रदेशावरून, धर्मापेक्षा वंश व जमात श्रेष्ठ मानतात - पाटोळे
कळंब दि.२१ (प्रतिनिधी) - मणिपूर राज्यात आज जो वाद सुरू आहे. या झगड्याचे कारण भूप्रदेश आहे. या राज्याची लोकसंख्या अधिक व जमीन कमी आहे. राज्यात प्रमुख जमाती कुकी व मैतई या असून नागा व कुकी या मिळून ५० टक्के लोकसंख्या व मैतई जमातीची लोकसंख्या ५० टक्के आहे. मैतई जमातीत वेगवेगळ्या धर्माचे लोक समाविष्ट असून एक वंशज आहेत. त्यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या हे एक आहेत. धर्मांतरित ख्रिश्चन असतानाही आपली संस्कृती जपतात. धर्मांतरित असूनही जुन्या धर्माप्रमाणे वागतात. ईशान्य भारतातील लोक स्वतःची वंशिक ओळख पुसू देत नाहीत. धर्मापेक्षा वंश व जमात श्रेष्ठ मानतात. तर राजकारणाच्या बाबतीत नॉर्थ ईस्टचे राजकारण दिल्लीकडे तोंड करून असते असे शाहू पाटोळे यांनी सांगितले.
कळंब येथे कळंब तालुका पत्रकार संघाच्यावतीने मणिपूर राज्यातील संघर्ष या विषयावर, थोड बसू, थोड बोलू, थोडी चर्चा करु या उपक्रम अंतर्गत माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सेवानिवृत उपसंचालक शाहू पाटोळे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्यांनी मणिपूर कालचे, आजचे आणि उद्याचे यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. तसेच आपल्या हक्काच्या व अधिकारांच्या बाबतीत लोक जागृत आहेत. मणिपूरसाठी संविधानाचे कलम ३७१ सी आहे. परंतू त्या कलमाच्या बाबतीत हे लोक बोलत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रामकृष्ण लोंढे, मुसदेक काझी, दखलचे संपादक गणेश शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी पंसचे माजी सभापती भास्कर खोसे, ज्येष्ठ पत्रकार अनंत आडसूळ, भागवतराव धस, जमीन अधिकार आंदोलनाचे विश्वनाथ तोडकर, जेष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव आडसूळ महाराज, भागवतराव धस, ज्येष्ठ पत्रकार गणेश शिंदे, मित्रजीत रणदिवे, भारत गुडे, बापू भंडारे, बाळासाहेब कांबळे, सााहित्यक रमेश बोर्डेकर, सामाजिक कार्यकर्त भास्करराव सोनवणे, बंडू ताटे, संजय पाटोळे, कामगार नेते डी.टी. वाघमारे, शहाजी रितापुरे, प्राचार्य जगदीश गवळी, शितलकुमार घोंगडे, आश्रुबा कोठावळे, श्याम तोडकर आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन माधवसिंग राजपूत यांनी तर आभार सतीश टोणगे यांनी मानले.