स्पर्शच्या आरोग्य सेवेचा मानवतावादी दृष्टीकोन कौतुकास्पद - आ. चौगुले

स्पर्शच्या आरोग्य सेवेचा मानवतावादी दृष्टीकोन कौतुकास्पद - आ. चौगुले

लोहारा दि.७ (प्रतिनिधी) - स्पर्शच्या आरोग्य सेवेचा मानवतावादी दृष्टीकोन कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आ.ज्ञानराज चौगुले यांनी दि.७ ऑक्टोबर रोजी काढले.
लोहारा तालुक्यातील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात डॉ.जॉय पाटणकर स्मृती प्रीत्यर्थ रोटरी क्लब कॉव्हेंट्री लंडन, अंबरनाथ, देवनार, सरस्वती प्रतिष्ठान मुंबई, प्रशांतराव परिचारक फौंडेशन पंढरपूर, निवासी दिव्यांग शाळा सास्तूर व स्पर्श ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच शितल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ईस्माईल मुल्ला, लंडन येथील प्रसिद्ध सर्जन डॉ जॉन क्लेग, प्रसिद्ध ऑर्थोपेडीक सर्जन डॉ. मयुरेश वारके, डॉ‌.प्रमोद काळे, डॉ. हेमाषु बेंद्रे, डॉ.दीप्ती ठाकूर, डॉ.अविनाश देठे मुंबई, रोटरी क्लब अंबरनाथ अध्यक्ष डॉ.लीना धांडे, नंदू शेनोय, परिचारक फौंडेशनचे राहुल पटवर्धन, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा डॉ.हरी पवार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगननाथ पाटील, फिजियोथेरपिस्ट डॉ.मंगेश कुलकर्णी, ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे डॉ.रमाकांत जोशी, 
निवासी अपंग शाळा सास्तुर बालाजी नादरगे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे सर्जन डॉ.मनीष सिन्हा, वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्तराज ठोंबरे, डॉ.अशोक मस्के, अरुण जगताप आदी उपस्थित होते.  पुढे बोलताना आ चौगुले म्हणाले की, ग्रामीण रुग्णालय स्पर्श मार्फत दिली जाणारी आरोग्य सेवा, आयोजित केली जाणारी आरोग्य शिबिरे ही कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे आत्मीयतेची, उत्साहाची व परिपूर्ण असतात. जे काही करू ते नेटके, नाविन्यपूर्ण, दर्जेदार झाले पाहिजे. आपल्यामुळे रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू फुलले पाहिजे हा मानवतावादी दृष्टीकोन जपणाऱ्या स्पर्शच्या आरोग्य सेवातील सातत्यपूर्ण योगदानाचे कौतुक वाटते. स्पर्श ग्रामीण रुग्णालय हे केवळ धाराशिव जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये नावलौकिक झाले असून आपल्या दर्जेदार आरोग्य सेवेमुळे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आदर्श मॉडेल ठरले आहे. तर या रूग्णालयामुळे ३०० पेक्षा जास्त गावांना आरोग्य सेवाचा लाभ होत असून मोठ्या प्रमाणात प्रसूती, सिझेरियन शस्त्रक्रिया व इतर मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होत असल्यामुळे गरजू गरीबांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाची सेवा आणखीन बळकट करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रमाकांत जोशी यांनी तर आभार मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !