अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एका नराधमास २० वर्षाचा कारावास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी ठोठावली शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी
एका नराधमास २० वर्षाचा कारावास 

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी ठोठावली शिक्षा


धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एका नराधम आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व ३२ हजार रुपये दंड अशी दुहेरी शिक्षा ठोठावली आहे. तर दुसऱ्या एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.  ही शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी दि.२७ जानेवारी २०२१ रोजी तिच्या मैत्रिणीकडे वही देण्यासाठी गेली होती. दरम्यान ती एकटीच असल्यामुळे एका नराधमाने फूस लावून पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी त्या गावात मोर्चा काढण्यात आला होता. तर जिल्हाधिकारी कार्यलयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. दरम्यान, भाजप नेत्या चित्राताई वाघ यांनी पीडित मुलीची भेट घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे तुळजापूर सरवांचेच लक्ष लागले होते.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके, मुकेश उर्फ भैय्या भगवान भोरे व आनंद शिवाजी घोडके या तिघांजणा विरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात भादंवि ३७६, ३४१, ३४२, ३४ सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या कलम ४,६, ८,१६ व १७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम.एम. शहा व एस.बी. मोटे यांनी केला होता. मात्र या गुन्ह्यामध्ये आनंद शिवाजी घोडके याचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याचे नाव  दोषारोपपत्र (चार्जशीट) मधून वगळण्यात आले होते. मात्र सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके व मुकेश उर्फ भैय्या भगवान भोरे यांच्या विरुद्ध दोषारोप सादर केले होते. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगताप यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आर.एस. म्हेत्रे यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणात पीडित मुलगी व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्वपूर्ण ठरली. या प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांच्यासमोर झाला. या प्रकरणात आलेला ठोस पुरावा व पीडितीही सुसंगत साक्ष व विशेष अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके यास २० वर्षे सक्तमजुरी व ३२ हजार रुपये दंड अशी दुहेरी शिक्षा ठोठावण्यात आली. तर मुकेश उर्फ भैय्या भगवान भोरे याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !